Confluence of Sanskrit and Technology MoU between KKSU and RCOEM

A Memorandum of Understanding (MoU) was recently signed between Shri Ramdeobaba College of Engineering and Management (RCOEM), a leading autonomous educational institution in Central India with Kavikulguru Kalidas Sanskrit University ( KKSU), Ramtek, a lone Sanskrit University in Maharashtra. The agreement is intended to combine ancient Sanskrit literature with modern science and technology. The MoU was exchanged in between Acharya Shrinivas Varakhedi, Vice Chancellor, Kavidkulguru Kalidas Sanskrit University and Prof. Nikhil Damle, Registrar, RCOEM. For the last three years, the Ministry of Human Resource Development has started a Non-formal Sanskrit Education centre at Shri Ramdeobaba College of Engineering and Management. Through this center, engineering students are receiving Sanskrit language training and trying to use the precious treasure hidden in Sanskrit literature and ancient literature for the benefit of the society. The agreement was signed through the visionary role of the Vice Chancellor Acharya Shrinivas Varakhedi and the RCOEM Principal Dr. Rajesh Pande. The MoU is expected to further boost the research attitude among faculty members, researchers and students of engineering and Sanskrit. Dr. Vijay Kumar CG, Registrar, KKSU; Dr. Prasad Gokhale, Director, Board of Planning and development, KKSU; Sumit Kathale, Assistant Registrar and Dr. Bhalchandra Hardas, Sanskrit Centre Coordinator, RCOEM were prominently present on the occasion.

Prof. Shrinivas Varakhedi and Prof. Nikhil Damle exchanging MoU between KKSU and RCOEM. Also  seen are Sumit Kathale, Dr. Vijay Kumar CG, Dr. Bhalchandra Hardas and Dr. Prasad Gokhale.

 

मध्य भारतातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी आणि प्रबंधन महाविद्यालय तसेच महाराष्ट्रातील प्रख्यात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ , रामटेक यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. प्राचीन संस्कृत साहित्य आणि आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समन्वय व्हावा यासाठी हा करार करण्यात आला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य श्रीनिवास वरखेडी आणि  श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी आणि प्रबंधन महाविद्यालयाचे कुलसचिव प्रा निखिल दामले यांनी सामंजस्य करार हस्तांतरित केला. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात गत तीन वर्षांपासून मानव संसाधन विकास मंत्रालयाचे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरु झाले आहे. या केंद्रामार्फत अभियांत्रिकी विद्यार्थी संस्कृत भाषा प्रशिक्षण प्राप्त करीत असून संस्कृत साहित्य आणि प्राचीन वाङ्मयात दडलेला अनमोल खजिना यांचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी प्रयत्नरत आहे. कुलगुरु आचार्य श्रीनिवास वरखेडी आणि  रामदेवबाबा महाविद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश पांडे यांच्या दूरदृष्टी भूमिकेतून कराराचे सूतोवाच झाले. प्रस्तुत करारामुळे अभियांत्रिकी आणि संस्कृतचे प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्यातील संशोधन वृत्तीस अधिक चालना मिळावी असा विचार आहे. रामटेक येथे संपन्न झालेल्या या करार हस्तांतरण सोहोळ्यास कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विजयकुमार सी जी , नियोजन आणि विकास मंडळ संचालक डॉ प्रसाद गोखले , सहायक कुलसचिव सुमित कठाळे आणि श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकीचे बौद्धिक संपदा विभाग समन्वयक डॉ भालचंद्र हरदास प्रामुख्याने  उपस्थित होते.

Add comment